पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाती

नाती हि दोन प्रकारची असतात ,रक्ताची आणि मनाची .कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती महत्वाची ठरतात .एकाच ई वडिलांची दोन मुले म्हणजे सख्खे भाऊ पक्के वैरी बनतात तर कॉलेज मध्ये असणारे मित्र जीवाला जीव देतात .लग्नानंतर पत्नी आणि तिच्या माहेरची माणसे हि नातेवाईक बनतात आणि जन्मभर साथ देतात .नात्यांबद्दल कितीही बोला तरी ते बोलणे परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही .ई वडील ,भाऊ ,बहिणी असे सर्व आपले जीवाभावाचे नाते असणारे लोक सतत साथ देत असतात ,काही अपवाद असतात ते आपण सोडून देऊ .आणखी असे किती तरी उदाहरण सांगता येतील ज्यात प्रेम आहे आदर आहे गुरु आणि शिष्य हे नाते हि अतिशय महत्वाचे आहे ,गुरुकुल परंपरा आता संपलेली असेल पण नव्या युगात विद्यर्थिअनि शिक्षक हे नाते सुद्धा अतिशय पवित्र मानले जाते .आपले शेजारी कोण आहेत किंवा ते कुठल्या जाती पंथाचे आहेत ह्या पेक्षा ते आपले शेजारी आहेत हे नवीन आणि अनोखे नाते असते व म्क्ल्त ते दृढ होत जाते इतके कि एकमेकांना सोडून हि मंडळी एक घास सुद्धा खात नाहीत असो अशी हि नाती फक्त माणसा माणसातच नाही तर माणूस आणि मुका प्राणी यामध्ये दिसून येतात .प्राचीन कथा मध्ये याचा उल्ले...